
NTPC Share Price | शुक्रवारी 01 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 0.82 टक्के वाढून 411.85 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनी मार्केट कॅप 3,98,872 कोटी रुपये आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 24 ऑक्टोबर रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या पेड-अप इक्विटी शेअर्सच्या फेस वॅल्यूच्या प्रति शेअर 2.50 रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीने लाभांशासाठी २ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
Axis सिक्युरिटीज फर्म – ‘BUY’ रेटिंग
Axis सिक्युरिटीज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. Axis सिक्युरिटीज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 450 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्या या शेअरची किंमत 411 रुपये आहे.
आगामी आयपीओ फायद्याचा
Axis सिक्युरिटीज फर्मच्या मते एनटीपीसी लिमिटेड कंपनीची मजबूत औष्णिक मालमत्ता कॅश फ्लो व्हिसिबिलीटी प्रदान करते आणि आगामी एनजीईएल आयपीओ कंपनीचे अक्षय ऊर्जा व्यवसाय मूल्य अनलॉक करू शकते. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे स्थिर लाभांश उत्पन्न आणि पुढील वाढीच्या संभाव्यतेमुळे एनटीपीसी शेअर फायद्याचा पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 11.60% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 75.07% परतावा दिला. मागील ५ वर्षात या शेअरने 238.97% परतावा दिला. तसेच YTD आधारावर या शेअरने 32.96% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.