29 April 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jai Balaji Share Price | कुबेर करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील एका वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता
x

BLOG : मुलींचं लग्नाचं वय आणि भारतीय मानसिकता...

Indian Mentality, Female, Women, Wedding Age, Marriage Age

मुंबई : लग्नसंस्था ही प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी फार महत्वाची घटना असते, केवळ वधुवरांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीदेखील ही घटना तितकीच महत्वाची असते. म्हणूनच पाल्याने वयाची विशी-पंचविशी ओलांडली कि त्याच्या लग्नाविषयीचे विचार आपसूकच पालकांच्या मनात घोळायला सुरुवात होते. पण जर मुलगी असेल तर मात्र मुलगी वयात आली कि तिच्या लग्नाविषयी घरात चर्चा व्हायला सुरुवात होते. मग मुलीला स्वयंपाक करता येणं किती आवश्यक आहे इथपासून ते सासरी गेल्यानंतर सासूशी कस वागायचं, सासरी कसं सांभाळून घ्यायचं इथपर्यंत त्या चर्चेला उधाण येतं.

आपल्याकडे भारतात मुलीचं लग्नाचं वय काय असावं हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनानुसार अवलंबून असतं हे कितीही खरं असलं तरी त्याला प्रादेशिक, धार्मिक आणि जातीय बाजूदेखील आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात काही समाजांमध्ये मुलीचं १८ ते २१ ह्या वयोगटात लग्न लावलेच जाते. ह्यामध्ये मुलीला शिकून न देणं, किंवा तिला प्रपंचात अडकवणं हा हेतू नसून, त्या विशिष्ठ समाजामध्ये जर पालकांनी मुलीचं लग्न त्या वयोगटात लावलं नाही तर त्यांना ‘समाज’ काय म्हणेल ह्या प्रसंगाला समोर जावे लागते. म्हणून मुलीचं लवकर लग्न लाऊन, तिला तिच्या इच्छेनुसार शिकायला देखील दिले जाते. पण हे उदाहरण झाले शहरी भागातील, जिथे मुलींना लग्नानंतर शिकायला दिले जाते. पण काही खेडेगावांमध्ये अजूनही अशी परिस्थिती आहे कि मुलीचे लवकर लग्न लावून तिला संसाराला जुंपले जाते. ह्यामागे इतर काही कारणाप्रमाणेच “ मुलीने तोंड ‘काळ’ केलं तर” अशीसुद्धा एक भावना असते. मग एकदा का लग्न लाऊन दिले कि आपली जबाबदारी संपली असा भाव घेऊन तिच्या माहेरून तिचे होणारे हाल दुर्लक्षित केले जातात. अर्थात सगळ्याच ठिकाणी लवकर लग्न होऊन मुलीचे हाल होतातच असे नाही पण बहुतांश वेळा परिस्थिती अशीच असते, कि मुलीने सासरच्यांची मने राखायची, काबाड-कष्ट करायचे व त्याविषयी व त्याविरोधात एकही शब्द उच्चारायचा नाही.

हे झाले काही विशिष्ठ समाजतील किंवा भागातील, जिथे मुलीच्या शिक्षणापेक्षा, तिच्या सक्षमतेपेक्षा आणि तिने तिची एक स्वतंत्र स्त्री म्हणून ओळख निर्माण करण्यापेक्षा तिचा संसार हा जास्त महत्वाचा मानला जातो. पण शहरांतूनही परिस्थिती केवळ काही अंशी निराळी आहे. शहरांमध्ये मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहणे महत्वाचे मानले जाते, पण त्याचसोबत मुलीने निदान २५ ते २७-२८ वयापर्यंत लग्न करावे अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. त्यामागच कारण हे मुलीचं पुढील आयुष्यात सगळं नीट व्हावं हा साधा उद्देश असला तरी देखील जर मुलीने २७-२८ पर्यंत लग्न केले नाही तर समाज तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघायला लागतो. ‘अरे, हिचे अजून लग्न झाले नाही, म्हणजे हिच्यातच काहीतरी दोष असणार’ अशी वाक्य अपोआपच समाजात रेंगाळायला सुरुवात होते व निष्कारण त्या मुलीला नावे ठेवली जातात.

असे का? तर ही भारतीय मानसिकता आहे ज्यात मुलीचे लग्न उशिरा झाले किंवा तिने लग्न केलेच नाही तर त्याचा दोष मुलीच्याच माथी लावला जातो. परंतु ह्यामागे मुलीची काही कारणे असतील ही बाब कोणी विचारातच घेत नाही. बरं, मुलीने जातीबाहेर लग्न केलं तर तो वाद निराळाच असतो. पण लवकर किंवा वेळेवर लग्न व्हावं ह्यासाठी त्या एका मुलीवर किती ओझं टाकल जातं, काही काही वेळा तर तिचं मत विचारातच न घेता तिचं लग्न ठरवलं जातं, आणि हे केवळ खेडेगावातच नाही तर शहरांमधूनही अशा घटना घडतात. थोड्यात काय तर मुलीने वयाच्या जास्तीत जास्त २८ वर्षापर्यंत लग्न करायलाच हवे, नाहीतर कुटुंबियांच नाक कापलं जातं, हिच भारतीयांची मानसिकता आहे व ज्यांना हे वाटत नाही असे भारतीय क्वचितच आढळयचे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x