4 May 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक
x

Viral Video | 12 वर्षांनंतर उगवते 'हे' फुल, मुलाने वृद्ध आईची इच्छा अशी पूर्ण केली, पार डोंगरावर उचलून घेऊन गेला

Neelakurinji Flower Kerala

Neelakurinji Flower Kerala | माई लेकरांचे प्रेम असीम आहे यामध्ये काही वाद नाही. सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, आई आणि लेकराचे प्रेम कसे असते. लहान बाळाला आई आणि बाबा फिरायला जाताना कशा प्रकारे कडेवर घेऊन जातात तसचं एक मुलगा आपल्या आईला कडेवर घेऊन भ्रमंतीवर निघाला आहे. तर चला आपण हा व्हिडीओ पाहूयात.

आईला घेऊन उंच टेकडीवर गेले मुले
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, केरळमधील दोन मुले त्यांच्या वृद्ध आईला खांद्यावर घेऊन जात आहेत आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका उंच टेकडीवर चढले आहेत. हे पश्चिम घाटातील नीलाकुरिंजी हे दुर्मिळ दिसणारे फुल आहे. असा दावा केला जात आहे की हे फूल 12 वर्षांतून एकदाच उमलते आणि कोट्टायम जिल्ह्यातील मुतुचिरा येथील रहिवासी 87 वर्षीय अलिकुट्टी पॉल यांनी त्यांच्या मुलांना सांगितले की त्यांना शेजारच्या इडुक्की जिल्ह्यात उमलणारी दुर्मिळ फुले पहायची आहेत. तसेच अलीकुट्टी पॉल वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त असल्याची माहिती आहे, आणि त्यामुळे त्या उंच पर्वत चढू शकत नाही.

जवळपास 100 किमीचा प्रवास जीपने केला
त्यांची मुले रोजन आणि सत्यन यांनी न डगमगता त्यांच्या आईला जीपमधून सुमारे 100 किमीचा प्रवास करून मुन्नारजवळील कालीपारा टेकड्यांवर गेले आहेत. पण तिथे गेल्यावरच कुटुंबाला कळलं की डोंगराच्या माथ्यावर जाण्यायोग्य रस्ते नाहीत आणि आपल्या आईचे स्वप्न अशा पद्धतीने सोडू इच्छित नसल्यामुळे, दोन्ही मुलांनी आपल्या वृद्ध आईला खांद्यावर घेऊन सुमारे 1.5 किमी डोंगराच्या माथ्यावर चढले आहेत, जे नीलाकुरिंजीच्या फुलांनी बहारलेले जांभळ्या रंगाचे शेत आहे. नीलाकुरिंजी (स्ट्रोबिलांथेस कुंथियाना) हे पश्चिम घाटात आढळणारे दुर्मिळ असे फूल आहे आणि केवळ एका विशिष्ट प्रदेशामध्ये बारा वर्षांनंतर फुलते.

12 वर्षांनंतर फुलते हे फुल
इडुक्की जिल्ह्यामध्ये मुन्नार हिल स्टेशन हे सर्वात प्रसिद्ध नीलाकुरिंजी फुलणारे ठिकाण आहे तसेच मुन्नारमध्ये नीलाकुरिन्जीचा पुढचा बहर 2023 मध्येच येणार आहे. परंतु या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला 2030 पर्यंत थांबायचे नसेल, 2018 पासून, नीलाकुरिंन्जी तामिळनाडूमधील कोडाईकनाल, तसेच कर्नाटकातील कोडागु आणि केरळमधील पूपारा येथे फुलले आहेत आणि यंदा कर्नाटकातील चिकमंगळूर आणि केरळमधील कालीपारा येथे नीलाकुरिंजी फुलविण्यात आले आहे. इडुक्की जिल्ह्यातील मुन्नारजवळील कल्लीपारा हे गाव नीलाकुरिंजी फुलण्यापर्यंत पर्यटनाच्या नकाशावरही नव्हते. तर या संधीचे तुम्हीही सोने करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video Neelakurinji flower kerala son fulfill his mother elikutty paul dream came 100km away Checks details 21 October 2022.

हॅशटॅग्स

Neelakurinji Flower Kerala(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x