18 May 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stocks | 5 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 50 लाख रुपये केले, हा स्टॉक खरेदी करावा का?

Penny Stocks

Penny Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन या वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील काही महिन्यांत आपल्या भागधारकांना प्रचंड मोठा परतावा कमावून दिला आहे. बडोदा रेयॉन कंपनीच्या शेअर्सनी मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 5000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. या काळात बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स 5 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता हे शेअर्स 250 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 345 रुपये आहे. त्याच वेळी, बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.42 रुपये होती.

1 लाखाचे झाले 52 लाख :
बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स 3 जून 2022 रोजी BSE निर्देशांकावर 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 268.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 जून 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रक्कम 52.45 लाख रुपये झाले असते. कंपनीचे बाजार भांडवल 615 कोटी रुपये आहे.

शेअर्सचा परतावा :
बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी गेल्या साडेचार महिन्यात आपल्या दीर्घकालीन शेअर धारकांना 5670 टक्के नफा कमावून दिला आहे. 1 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 268.05 रुपये वाढली आहे. कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की मागील एका महिन्यात बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर्स 87 टक्क्यांनी वर गेले आहेत. त्याच वेळी, मागील 5 दिवसात या कापड कंपनीच्या शेअर्समध्ये 19 टक्केची पडझड झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Baroda Rayon corporation share price return on investment on 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x