2 May 2024 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

'सावळाहरी' गोष्ट एका गोड उद्योगाची..

Sawalahari Ice cream brand, Sawalahari Ice cream

पुणे : हडपसरचे साधना विद्यालय. कर्मवीर भाऊराव पातळ्यांच्या संस्कार असलेली हि शाळा. या शाळेत १९९६ दहावी पास होऊन बाहेर पडलेले मित्र. आई वडिल्यांच्या स्वप्नाप्रमाणे स्वतःच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवलं. लग्न झाली. मूल सुद्धा झाली. आता मूल शाळेत जाऊ लागली. पुण्यासारख्या शहरात स्वतःची घरे झाली. सगळं कसा चांगला होऊ लागला. मग एक दिवस व्हॉट्सअँप आला आणि जुन्या वर्गमित्रांचा ग्रुप बनला. ग्रुपचं नाव होत VIRTUAL कट्टा या ग्रुपवर १९९६ साली पास होऊन बाहेर पडलेले वीस-बावीस मित्र एकत्र आले.

त्यातीलच ५ जणांची हि गोष्ट. पहिल्याच नाव आहे अनिकेत गायकवाड. अनिकेत फुलांच्या सजावटीचा व्यवसाय करत नंतर रियल इस्टेटच्या व्यवसायात पडले. व आपल्या प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी त्या व्यवसायात नाव कमवले. दुसऱ्याच नाव आहे अजय ढाणे. MCS झालेले अजय आयटी फर्म मध्ये चांगल्या हुद्द्यावर कमला होते. पुढे जाऊन त्यांनी स्वतःची आयटी कंपनी काढली व तेदेखील आपल्या उद्योगात सेट झाले. तिसऱ्याचे नाव सुमित बनकर. सुमित यांनी फायनान्स मध्ये MBA केले. व पुढे त्यांनीही आपल्या क्षेत्रात नाव कमवले. चौथ्याच नाव प्रदीप कामथे.

आज हडपसरमध्ये नावाजलेले CA म्हणून प्रदीप कामथे यांचे नाव घेतले जाते. राहिला तो पाचवा त्याच नाव संदीप गार्डे. संदीप हे अँग्रीकल्चर रिलेटेड वस्तूंच्या विक्रीतून स्वतः विक्रते झाले. व आपल्या व्यवसायात ते सुद्धा सेट झाले. आपापल्या आयुष्यात सर्वजण सुखाने जगू लागलेले. नाव कमावून, घर कुटुंब सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत प्रतिष्ठेचं आयुष्य सुरु झालं होत. आयुष्यभर केलेल्या कष्टाचा फळ आता कुठे मिळू लागल होत. या वयात जुन्या आठवणींना उजाळा म्हणून एक व्हॉट्सअँप ग्रुप काढला. गप्पा, चेष्टा, मस्करी,या ग्रुपमध्ये कित्येक वर्षांनी पुन्हा सुरु झाल्या. याचा अर्थ असा नाही हे लोक एकमेकांना भेटच नव्हते. सातववाडीत असणारा हक्काचा कट्टा या मित्रांना नेहमीच आपलासा वाटायचा.

एकदिवस बोलता बोलता ग्रुपवर विषय निघाला तो आईस्क्रीमचा! लहान असताना पॉटच आईस्क्रीम मिळायचं. पॉटच आईस्क्रीम म्हणजे बाहेरून एअर प्रेशर न देता हाताने बनवलेलं आईस्क्रीम. जुन्या आठवणींना आता पुन्हा उजाळा मिळाला. आताच्या आईस्क्रीमचा सर्वात मोठा तोटा होता तो म्हणजे एक लिटरच आईस्क्रीम घेतलं आणि ते वितळल तर ते अर्ध्या लिटरच बनत. निम्या आईस्क्रीम मध्ये निम्मी हवा असते. साहजिकच पूर्वीच्या काळी जे आईस्क्रीम लागायचं ती चव आताच्या आइस्क्रीमला नाही. हा विषय इतका वाढत गेला आणि थांबला तो आपणच सुरु करूयात का आईस्क्रीम चा उद्योग ? या मुद्यांवर. बोलायला खूप छोटा वाक्य होता पण त्यामागे तडजोडही तितकीच होती.

ग्रुपवरच्या सगळ्यांनीच याला पाठिंबा दिला. व ग्रुपवरचे पाच जण पुढे आले आणि दुसऱ्याच दिवशी या पाच जणांनी हडपसरच्या सातववाडीचा कट्टा गाठला. लहानपणीपासून सगळ्याच गोष्टींचा साक्षीदार असलेला हा कट्टा याही गोष्टीचा साक्षीदार बनला कि आपण पॉट आईस्क्रीम चा उद्योग सुरु करायचा. पाचही जण वेगवेगळ्या क्षेत्रातले. प्रत्येकाने आपापली जाजाबदारी वाटून घ्यायची असे ठरवले. भारतात कोण कोण पॉट आईस्क्रीम चा व्यवसाय करत इथपासून ते रोज रात्री वेळ काढून पुण्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन आईस्क्रीम खाण्यापर्यंत हा प्रकार सुरु झाला. इतकच नाही तर या पाच जणांनी पुढचं वर्षभर घरी जेवायचच सोडून दिल. रोज रात्री नव्या आईस्क्रीम चा ब्रँड शोधायचा आणि प्रत्येक प्रकारचं आईस्क्रीम खाऊन बघायचं. हा शोध फक्त पुण्यापर्यंतच राहिला नाही तर दिल्लीपासून केरळपर्यँत वेगळा काय मिळत इथपर्यंत पोहोचला.

अखेर ठरला आपण पॉट आईस्क्रीम चा व्यवसाय सुरु करू शकतो. वर्षभराच्या या कष्टाचं फळ म्हणजे हडपसरच्या डी. पी. रोडवर आईस्क्रीमच उभा राहिलेल पहिल दुकान. त्याच नाव होत सावळाहरी विठ्ठलाच्या नावाने सुरु झालेल्या या व्यवसायाच उदघाटन या पाचही जणांनी आपल्या आईंच्या हस्ते केले. वयाच्या चाळीशीत पोचलेल्या आपल्या मुलांच कौतुक त्या आयांना सर्वात जास्त होत. पण सावळाहरी हा काय एक दिवसात उभा राहिलेला ब्रँड नाही तर त्यामागे होता या पाच जणांनी शाळेपासून एकमेकांवर टाकलेले विश्वास होता. जोपर्यंत आईस्क्रीम आपल्याला हवी तशी बनत नाही तोपर्यंत ती विकायची नाही अस ठरल. याच कारण म्हणजे हा उद्योग आईस्क्रीम पहिल्यासारखी मिळत नाही या वाक्यामुळे सुरु झाला होता.

मनासारखा होण्यासाठी या पाच जणांनी स्ट्रॉबेरी महाबळेश्वरवरून, पेरू अंजीर सासवड वरून, आंबा रत्नागिरीतून, अननस कर्नाटकमधून घायचा निर्णय घेतला. जे जिथं पिकत तिथूनच ते घ्यायच असं ठरलं. या खरेपणामुळे पुण्यात एका वर्षात सावळाहरी च्या ९ शाखा सुरु झाल्या. या ९ शाखांमध्ये सुमारे १०० लोकांना रोजगार मिळला. मुंबई, नाशिक, कोल्हापूर. औरंगाबाद, नगर, बारामती,सातारा अशा शहरात हा ब्रँड विस्तारण्यासाठी सज्ज झाला. इतकंच नाही तर अजमेरच्या एका ग्राहकाने सावळाहरीचा ब्रँड राजस्थानात घेऊन जाण्याची देखील तयारी केली. एका वर्षात सावळाहरी हा आईस्क्रीम मधला सर्वात विश्वासू ब्रँड बनला तो या पाच जणांच्या जिद्दीने खरेपणाने आणि एकमेकांवरचा त्यांच्या विश्वासाने. या पाच जणांनी दाखवून दिले कि व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर फक्त माणसे आणि भांडवल जरुरीचं असत असं नाही महत्वाचा असतो तो विश्वास जिद्द आणि आपली वस्तू ग्राहकांपर्यत उत्तमरीत्या पोहोचवण्याचा खरे पणा.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x