
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीबाबत सकारात्मक अपडेटनंतरही शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या अपडेटनुसार, ‘डिसेंबर तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने एकूण ४२५.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आता गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं याबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.
इरेडा शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअर 2.01 टक्क्यांनी घसरून 211.75 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 310 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 101.20 रुपये होती. इरेडा कंपनीचे एकूण मार्केट कॅप 57,048 कोटी रुपये आहे.
कंपनीचा निव्वळ नफ्यात मोठी वाढ
इरेडा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘वार्षिक आधारावर इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीला ३३५.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तसेच डिसेंबर तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचा महसूल ३५.६० टक्क्यांनी वाढून १६९८.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत इरेडा कंपनीचा महसूल १२०८.१० कोटी रुपये होता.
इरेडा शेअर्सबाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला
लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ अंशुल जैन म्हणाले की, “इरेडा कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी ही सौर क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्याच्या कंपनीच्या सकारात्मक धोरणाचे संकेत देत आहे. ज्यामुळे इरेडा कंपनी महसूल आणि नफ्यात सातत्य राखत आहे. ज्यामुळे हा शेअर लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून फायद्याचा ठरू शकतो.
स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित बगडिया इरेडा शेअरबाबत सल्ला देताना म्हणाले की, ‘टेक्निकल चार्टवर इरेडा शेअरला २०० रुपयांवर भक्कम सपोर्ट आहे. जर शेअरने २३० रुपयांचा टप्पा ओलांडला तर मध्यम मुदतीत शेअर २६० रुपयांपर्यंत वाढू शकतो असं सुमित बगडिया म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.