11 December 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Investment Tips | मुलांच्या भविष्यासाठी दररोज 150 रुपये गुंतवा आणि मिळवा 19 लाख रुपयांचा परतावा, योजनेबद्दल जाणून घ्या

Investment Tips|

Investment Tips | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC देशात घराघरात पोहोचली आहे. भारतात लोक LIC पॉलिसी मध्ये विश्वासाने गुंतवणूक करतात. आणि LIC ही आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना बाजारात आणत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना लाँच केली आहे, जी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही दररोज 150 रुपये जमा करून 14 लाख रुपये परतावा कमवू शकता. आहे की नाही, बंपर स्कीम? चला तर मग जाणून घेऊ LIC च्या या नवीन योजनेबद्दल.

पालकांना नेहमी आपल्या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, लग्नाची, एकंदरीत आर्थिक भविष्याची काळजी वाटत असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या आर्थिक भविष्याची काळजी वाटत असेल, आणि तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर, भारतीय आयुर्विमा महामंडळ/LIC पेक्षा चांगला पर्याय तुम्हाला कुठेच मिळणार नाही. LIC च्या अनेक पॉलिसी अनी गुंतवणूक योजना बाजारात सध्या चालू आहेत, त्यापैकीच एक पण सर्वात भारी अशी गुंतवणूक योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आपण LIC च्या नवीन Children Money Back Policy बद्दल माहिती घेणार आहोत. LIC ची ही योजना एक नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी स्कीम आहे, याचा अर्थ ही योजना बाजाराच्या जोखमीच्या अधीन नाही. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही हमखास परतावा आणि बोनसही मिळवू शकता.

New Children Money Back Plan :
तुम्ही या योजनेत दररोज 150 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. दररोज 150 रुपये प्रमाणे तुमची वार्षिक गुंतवणूक रक्कम 55,000 रुपये जमा होईल. जर तुम्ही 25 वर्ष नियमित गुंतवणुक करत राहिलात, तर तुमची एकूण गुंतवणुक रक्कम 14 लाख रुपये होईल. योजनेच्या मॅच्युरिटीवर एकूण गुंतवणूक रकमेसह तुम्हाला व्याज आणि बोनस मिळून 19 लाख रुपये परतावा मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योजना चालू असताना जर विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तरच हा नियम लागू असेल. जर तुम्ही जमा असलेले पैसे काढले नसतील तर तुम्हाला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम परताव्यासह दिली जाईल.

पोलिसीचा कालावधी आणि परतावा :
या पॉलिसीचा कमाल कालावधी 25 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. LIC च्या या योजनेत तीन वेळा Money Back benifits दिले जातील. 18 वर्षानंतर पहिल्यांदा, 20 वर्षानंतर दुसऱ्यांदा आणि वयाच्या 22 व्या वर्षी तिसऱ्यांदा money Back बेनिफिट मिळेल. वरील तीन मनी बॅक बेनिफिटमध्ये, तुम्हाला 20-20 टक्के रक्कम दिली जाईल,आणि योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला मूल 25 वर्षांचे झाल्यावर एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के रक्कम दिली जाईल.

पॉलिसीचे महत्त्वाचे फायदे :
या योजनेत गुंतवणूक करताना तुमच्या मुलाचे वय 0 ते 12 वर्ष असावे. तुम्हाला गुंतवणुकीच्या 60 टक्के रक्कम तीन वेळा money Back Benifit नुसार दिले जातील. आणि 40 टक्के उर्वरित रक्कम योजनेच्या परिपक्वतेवर दिली जाईल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किमान 1 लाख रुपये आणि कमाल रक्कम तुम्हाला हवी तेवढी निवडू शकता. पॉलिसीची मुदत 25 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीची रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाईल. जेव्हा तुमचे मूल 18 वर्षांचे होईल तेव्हा त्यास प्रथम Money Back बेनिफिट मिळेल. मुलांच्या भविष्याचे नियोजन करण्यासाठी ही योजना तुम्हाला नक्कीच मदत करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips in LIC children Money Back Policy for long term investment benefits on 17 May 2023.

हॅशटॅग्स

#Investment Tips(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x