 
						Tata Steel Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीचा पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये ३११ अंकांची वाढ होऊन तो ७६९३० वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीमध्ये ७४ अंकांची वाढ होऊन तो २३२७७ वर पोहोचला होता. दुसरीकडे, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
टाटा स्टील शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी टाटा स्टील कंपनी शेअर 0.11 टक्क्यांनी वाढून 130.42 रुपयांवर पोहोचला होता. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 184.60 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 122.62 रुपये होती. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,62,910 कोटी रुपये आहे.
टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट
टाटा स्टील लिमिटेड कंपनीने ओडिशातील खनिज धारक जमिनीवर टॅक्स आकारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. टाटा स्टील कंपनी असामान्य अधिकारक्षेत्राचा वापर करण्याची मागणी करीत आहे. ज्यामुळे या प्रदेशातील कंपनीच्या भविष्यातील कामकाजावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत आहेत. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरची ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेजने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १८० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
टाटा स्टील शेअरने किती परतावा दिला
मागील १ वर्षात टाटा स्टील शेअरने फक्त 0.43 टक्के वाढला आहे. मागील ५ वर्षात टाटा स्टील शेअरने गुंतवणूकदारांना 170.29 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये टाटा स्टील शेअरने 1780 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		