11 December 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Balu Forge Share Price | असे मल्टिबॅगर शेअर्स निवडा! बालू फोर्ज इंडस्ट्रीज शेअर अल्पावधीत देतोय शेकड्यात परतावा, दिग्गजांकडून खरेदी

Balu Forge Share Price

Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. आशिष कचोलिया यांनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज या कंपनीच्या स्मॉल कॅप शेअरमधून अवघ्या तीन महिन्यांत 25 कोटी रुपये नफा कमावला आहे.

कचोलिया यांनी जुलै 2023 मध्ये बालू फोर्ज कंपनीचे 2.16 टक्के म्हणजेच 21,65,500 शेअर्स 115.45 रुपये किमतीवर खरेदी केले होते. या कंपनीच्या शेअरची किंमत आता 230.45 रुपये किमतीवर पोहोहली आहे. अवघ्या तीन महिन्यांत आशिष कचोलिया यांनी जवळपास 25 कोटी रुपये नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी बालू फोर्ज इंडस्ट्रीज स्टॉक 3.92 टक्के घसरणीसह 212.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

YTD आधारे बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 134.71 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीमधील आशिष कचोलिया त्यांच्या शेअर्सचे मूल्य 49.9 कोटी रुपये आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये 36 विविध कंपन्यांचे शेअर्स होते. त्यांच्या सर्व शेअर्सचे एकूण मूल्य 2382.2 कोटी आहे.

सिंगापूर स्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार सिक्स्टीन स्ट्रीट इन्व्हेस्टिंग फर्मने बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, FII फर्मने या मल्टीबॅगर स्टॉकमधील 2.32 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे 25 लाख शेअर्स 183.60 रुपये किमतीवर खरेदी केले होते. याचा अर्थ सिंगापूर स्थित FII च्या शेअर्सचे एकूण मूल्य 45.90 कोटी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Balu Forge Share Price today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Balu Forge Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x