
Jio Finance Share Price | मागील अनेक दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार देखील चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. विशेष म्हणाले अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अत्यंत स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी संधी देखील गुंतवणूकदारांना मिळाली आहे.
मात्र सध्याच्या स्थितीत कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावा असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. कोणते शेअर्स होल्ड करावेत आणि कोणत्या शेअर्समधून बाहेर पडावे असा प्रश्न देखील गुंतवणूकदारांना पडला आहे. दरम्यान, चॉइस इक्विटी ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट कुणाल परार यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. कुणाल परार यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी टार्गेट प्राइस सुद्धा जाहीर केली आहे.
चॉइस इक्विटी ब्रोकिंग फर्मचे कुणाल परार यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत संकेत देताना म्हटले आहे की, ‘ज्या गुंतवणूकदारांनी शॉर्ट टर्मसाठी हा शेअर खरेदी केला असेल त्यांनी या शेअरमधून बाहेर पडावे. मात्र ज्यांनी हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी केला असेल ते हा स्टॉक ‘होल्ड’ करू शकतात. कारण शॉर्ट टर्ममध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर २३० ते २२५ रुपयांपर्यंत घसरू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
जेव्हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर २३०-२२५ रुपयांपर्यंत घसरेल आणि त्यानंतर पुन्हा ३४० रुपयाच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो, असे विश्लेषकांनी म्हटलं आहे. तसेच मध्यम आणि लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर २३० रुपयांवर आला तरी गुंतवणूकदारांची एव्हरेजिंग सुरूच ठेवली पाहिजे, कारण येत्या काळात हा शेअर ४०० ते ४७५ रुपयांच्या टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.