9 May 2025 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली
x

Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल

Post Office Scheme

Post Office Scheme | बहुतांश व्यक्ती आपल्या कमाईचा काही भाग सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवतात. सुरक्षिततेसाठी पोस्टाच्या योजनांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी पोस्टाच्या खात्यामध्ये आपले पैसे गुंतवून भरभरून लाभ मिळवला आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका दमदार योजनेची माहिती सांगणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने खातं उघडल्यास तुम्हाला लखपती होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र :
आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली आत्तापर्यंतची पोस्टाची योजना म्हणजेच ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ या योजनेविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. पोस्टाच्या या सरकारी योजनेवर तुम्हाला वार्षिक आधारावर ७.५ टक्क्यांचे आकर्षित व्याजदर दिले जाते.

योजनेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्या :
1. पोस्टाची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना एखाद्या एफडी योजनेपेक्षा 2 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक व्याजदर देण्याचा प्रयत्न करते. पोस्टाच्या या खात्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना तब्बल 7.5% दराने व्याजदर प्रदान केले जात आहे.

2. ही एक प्रकारची बचत योजना असल्याकारणाने सरकार देखील योजनेकडे लक्ष देऊन असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे कुठेही जात नाहीत. पोस्टमध्ये तुमच्या पैशांशी अजिबात सायबर प्रॉडक्ट होत नाही. त्यामुळे अगदी निश्चिंतपणे तुम्ही पोस्टाच्या खात्यामध्ये आपले पैसे गुंतवू शकता.

3. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेसाठी वयाची कोणतीही अट दिली गेली नाही. तुम्ही तुमच्या आईसाठी, पत्नीसाठी, तुमच्या मुलीसाठी या योजनेमध्ये खातं उघडून देऊ शकता. सर्वात मोठी आणि विशेष सुविधा म्हणजे योजनेमध्ये योगदानाचे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 40% टक्के रक्कम काढता देखील येते.

पैसे गुंतवणुकीसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत :
भारतात राहणारी भारताची कोणतीही महिला पोस्टाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यामध्ये स्वतःच्या नावाने खातं उघडू शकते. यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड त्याचबरोबर 2 रंगीत पासपोर्ट साईचे फोटो लागणार आहेत.

गुंतवणुकीची शेवटची तारीख जाणून घ्या :

 पोस्टाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेमध्ये केवळ 31 मार्चपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या महिला मैत्रिणीजवळ ही माहिती पोहोचवा आणि तिला गुंतवणूक करण्यास सांगा.

व्याज आणि परतावा :
योजनेच्या व्याज आणि परताव्याविषयी सांगायचे झाल्यास समजा एखाद्या महिलेने 2 वर्षाच्या या योजनेमध्ये 2 लाखांची रक्कम गुंतवली तर, ठरलेल्या 7.50% व्याजदरानुसार मॅच्युरिटीवर महिलेला 2 लाख 32 हजार 44 रुपयांची रक्कम परत मिळेल. म्हणजेच 7.50% दरानुसार 32 हजार 44 रुपयांची रक्कम 2 वर्षांत गुंतवल्यानंतर केवळ व्याजाने मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(234)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या