6 May 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

गझनीनंतर जर कोणी सर्वाधिक मंदिरं तोडली असतील तर ती मोदींनी: पत्रकार आतिश तासिर

Narendra Modi, Temples

वाराणसी: देशभर मागील ५ वर्षांपासून मोदी सरकार सत्तेत आल्यावर विरोधकांनी अयोध्येतील राम मंदिरावरून सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. त्यात मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नही बताएंगे अशी टीका विरोधकांनी सातत्याने केली आहे. मागील अनेक दशकांपासून अयोध्येतील विवादित जमिनीसंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. २०१४ पासूनच्या जाहीरनाम्यात देखील राम मंदिर हा प्रमुख मुद्दा राहिला आहे आणि हिंदुत्व त्यातील प्रमुख आकर्षण असं म्हणता येईल.

एकाबाजूला सत्ताधारी आक्रमक पणे हिंदुत्वाचा मुद्दा रेटत असताना दुसऱ्या बाजूला मात्र वेगळंच चित्र असल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते देखील मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो देईल, मात्र तत्पूर्वी अनेक मंदिर जमीनदोस्त केली जात आहेत याचे सबळ पुरावे देखील एका पत्रकाराने प्रसिद्ध करत भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींच्या हिंदुत्वाची पोलखोल केली आहे.

प्रसिद्ध पत्रकार आतिश तासिर यांनी एका महंतांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट मंदिरं जमीनदोस्त करण्याचा आरोप ठेवला आहे. तासिर यांनी वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो शेअर करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये, औरंगजेबाला तर विसरुनच जावा, काशी विश्वनाथ मंदिरातील एका महंतांनी असं म्हटलंय, असे लिहिलं आहे. तसेच, गझनीनंतर इतर कुठल्याही व्यक्तीने एवढे मंदिर तोडले नसतील जेवढे, मोदींनी तोडले आहेत, असे म्हटले आहे.

तासीर यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ते महंत वाराणसी येथे सरकारद्वारे बनविण्यात येत असलेल्या कॉरिडोअरसंदर्भात बोलत आहेत. केवळ एक स्मारक बनविण्यासाठी शहराचा आत्मा असलेल्या भागाला नष्ट करण्यात येत आहे, असे महंतांचे म्हणणे असल्याचेही तासीर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडोर बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कॉरिडोअर बनविण्यासाठी या परिसरातील घरे आणि लहान-मोठी मंदिरे काढण्यात आली आहेत.

गंगा नदीकाठच्या ललिता घाट आणि मणकर्णिका घाट येथून ते काशी विश्वनाथ मंदिरपर्यंत हा कॉरिडोअर बनविण्यात येत आहे. या निर्माण प्रक्रियेत ज्या लोकांची घरे पडली आहेत, ते या कॉरिडोअरला आपला विरोध दर्शवत आहेत. तसेच, मंदिर काढण्यात येत असल्याने अनेक महंत आणि पुजारीही नाराज असल्याचं समजते. परंतु, सरकारकडून केवळ अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचं सागिंतलं जात आहे. त्यामुळे सरकारच्या दुप्पटी धोरणांची एकप्रकारे पोलखोल झाल्याचं म्हटलं जातं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x