29 April 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

न्यायालयाच्या आदेशाने भाजप नगरसेवक विलास कांबळे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

bjp corporator Vilas kamble, Rape Case, Court

ठाणे : देशभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणात सत्ताधाऱ्यांचे पदाधिकारी आणि आमदार अडकल्याचे अनेक दाखले आज उपलब्ध आहेत. तसाच काहीसा अजून एक प्रकार उजेडात आला आहे. कारण ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकावर एका बारमधील सिंगरने बलात्काराचा आरोप केला आहे.

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. विलास चंदू कांबळे असे या नगरसेवकाचे नाव असून त्याच्यासह संदिप साळवे आणि लव्हा यांच्या विरोधातही या महिलेने तक्रार केली आहे. विशेष म्हणजे विलास कांबळे हाच भाजप नगरसेवक ठाणे महापालिकेत स्थायी समितीचा माजी सभापती देखील होता असं समोर आलं आहे.

ठाण्यातील सावकरनगर येथील एका ३२ वर्षीय तरूणीला विलास चंदू कांबळे याने लग्न करण्याचे अश्वासन दिले होते. याच लग्नाच्या आमिषाने फसवून ह्या व्यक्तीने तीच्यावर २०१७ ते २०१९ पर्यंत वारंवार फसवणूक करून बलात्कार केला. तर त्याचे मित्र संदिप साळवे आणि लव्हा यांनी त्याच्या विनयभंगाचा प्रकार केला. तिच्या घरामध्ये घुसून तिला ठार मारण्याचीही धमकी दिली होती. दोस्ती विहार वृष्टी बि विंग इथे हा प्रकार झाल्याचे या महिलेच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. विलास कांबळे हा बहुजन सामजवादी पार्टीमधून निवडून आला असून २०१६ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक १५ ड मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांची पत्नी सुवर्ण कांबळे देखील ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहे.

यापूर्वी देखील हा नगरसेवक अनेक विवादास्पद प्रकरणात अडकला आहे. ठाण्यातील लेडीज बारमध्ये त्याला गाणी गाताना देखील बघण्यात आलं असून तो एक अय्याश नगरसेवक असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुलुंड चेकनाका येथील नंदादीप बारमध्ये तो सिंगरचे माईक हुसकावून घेत स्वतःच मद्यावस्थेत गाणी गातो असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी अत्यंत विवादास्पद राहिली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x