8 May 2025 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

श्रीवर्धन: अवधूत तटकरेंविरुद्ध ६०९६१ मतं घेणाऱ्या सेनेच्या रवी मुंढेंचं राजकीय अस्तित्व धोक्यात?

Shrivardhan, Shivsena Ravi Mundhe, NCP MLA Awadhut Tatkare, Shivsena, NCP, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्ष आणि सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी एनसीपी-काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आता एनसीपीला आणखी एक धक्का बसणार आहे. एनसीपीचे आमदार अवधूत तटकरे हे सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेतील या इनकमिंगमुळे अनेक मतदारसंघात मूळ शिवसैनिकांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचं चित्र आहे. अनेक मतदारसंघात पदाधिकारी मागील २-३ वर्षांपासून कामाला लागले होते आणि २०१९ मध्ये विधानसभा गाठायचीच असा चंग बांधला होता. मात्र पक्षप्रमुखांनी इतर पक्षातील लोकांपुढे आणि त्यांच्या अर्थशक्तीपुढे लोटांगण घातल्याची भावना अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अनेकांनी हे पैशाच्या व्यवहारावर होत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही शिवसेना वाढवतो आणि ज्यांच्या विरुद्ध लढा देतो त्याच लोकांना पक्ष निवडणुका आल्या की जवळ करतो आणि आम्हालाच संपवण्याची योजना आखतो असं या पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्‍यांचे शिवसेनेत स्‍वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्‍याचे पक्ष प्रवेशानंतर रघुवीर देशमुख म्‍हणाले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत.

दरम्यान, श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसेनेच्या रवी मुंडे यांच्याप्रमाणे अनेक उमेदवारांनी २०१४ मधील निवडणुकीत प्रतिस्पर्धीना कडवी झुंज देत दिग्गज उमेदवारांना पाडण्यासाठी शक्ती पणाला लावली होती आणि त्यावेळी अनेकांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतली होती. मात्र पक्ष आज त्याच लोकांना डावलून केवळ पैशाच्या मोबदल्यात आम्हालाच संपवत आहे अशी संतापजनक भावना अनेक शिवसैनिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या