27 April 2024 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
x

राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; हे वाचाळवीर कुठून टपकतात? मोदींचा उद्धव यांना टोला

Narendra Modi, PM Narendra Modi, CM Devendra Fadanvis, Uddhav Thackeray, Ram Mandir, Ayodhya Bhumi

नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली . नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालय प्रकरण ऐकून घेत आहे. हे वाचाळवीर कुठून टपकतात माहीत नाही. का ते या प्रकरणामध्ये अडचण निर्माण करू पाहत आहेत? सर्वोच्च न्यायालय, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि न्यायप्रणालीवर आपला विश्वास असायला हवा. या नाशिकच्या पवित्र जमिनीवरून मी अशा वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, रामासाठी, देवासाठी डोळे बंद करून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राम मंदिराची मागणी रेटली होती. जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मोदींचा हा वाचाळवीरांचा टोला अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x