7 May 2025 4:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

रम्या'कडे बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांसाठी डोस'चं नाही; फक्त विरोधक?

Ramya, BJP cartoon, Raj Thackeray, MNS Chief Raj Thackeray, BJP Maharashtra

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भारतीय जनता पक्षाच्या रम्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भयंकर चिंता सतावत असल्याचं दिसत आहे. राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांनी तोंड वर काढलेलं असताना रम्या सरकारला डोस देण्याऐवजी राज ठाकरे यांच्या नावाचाच जाप करत असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातील १०० ते १५० जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याआधीच भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. भाजपनेही समाज माध्यमांचा वापर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मोठं कँपेन सुरू केलं केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना डोस पाजण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘रम्याचे डोस’ सुरू केले. मात्र भाजपच्या या रम्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच लक्ष केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर ईडीची चौकशी लागली असून कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना ‘कोट्याधीश जादूगार’ म्हणत टि्वट केलं आहे. असं असलं तरी भाजपच्या रम्याने मुंबईने भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या मिल खरेदीच्या जादूकडे कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत असून, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आणि महिलांविषयक मुद्यांवर रम्याकडे सरकारसाठी कोणतेही ‘डोस’ नसल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या