3 May 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

आज गानसम्राज्ञी लतादीदींचा ९०वा वाढदिवस

Lata Mangeshkar, Gaansamradhni, Bharatratna Lata Mageshkar, Mageshkar Family

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. सप्टेंबर २८, इ.स. १९२९ लता मंगेशकर यांचा जन्म झाला आहे. लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात गोमंतक कलावंतीण मराठा (देवदासी) कुटूंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया.

भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे.

आपल्या आवाजाच्या जादूने देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लतादीदींनी आपल्या सुमधूर आवाजाने देशाला मंत्रमुग्ध केलं. लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून त्या आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव ‘हेमा’ असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी ‘लता’ असे नाव ठेवले.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकराना भारतीय कोकीळा म्हणतात.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x