8 May 2025 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

कोथरूड: चंद्रकांत पाटलांसाठी मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट

Chandrakant patil, Medha Kulkarni

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने ९० टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. दरम्यान ब्राह्मण समाजाचा तीव्र विरोध असताना देखील चंद्रकांत पाटलांना कोथरूड येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या