21 October 2019 4:11 PM
अँप डाउनलोड

पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी

Sudhir Mungantivar, BJP, NCP, Congress

पुणे : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी एकूण १७६ मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भारतीय जनता पक्षाच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर एनसीपीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत. ऐश्वर्या आशुतोष जाधव यांनी गत महापालिका निवडणूक राष्ट्रवादीमधून लढली होती. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या आहेत.

हॅशटॅग्स

#NCP(178)#Sudhir Mungantiwar(10)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या