15 October 2019 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील तरुणांमध्ये बँकिंग क्षेत्र आणि सरकारी नोकरीप्रति अधिक आकर्षण: ओलिवबोर्डच सर्वेक्षण नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों' धक्का! नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली
x

पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या?

Pakistan, Pak Military

कराची : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावलपिंडी येथे सैन्याच्या इस्पितळामध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटावेळी इस्पितळामध्ये जागतिक संघटनेने दहशतवादी घोषित केलेला जैश-ए-मोहम्मदचा मुख्य मसूद अजहरदेखील उपचारासाठी दाखल होता. अद्याप मसूद अजहरचं या स्फोटात नुकसान झालं की नाही याबाबत काही माहिती मिळाली नाही.

स्फोटात जखमी आणि मृत झालेली आकडेवारी अधिकृतरित्या समोर आलेली नाही. परंतु पाकिस्तानी सूत्रांनुसार कमीत कमी १६ लोक या गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. हा स्फोट नक्की कोणी घडवून आणला याबाबत कळू शकलं नाही. दरम्यान काही जणांचे म्हणणं आहे की, गॅस पाईपलाइन लिकेज झाल्याने हा भयंकर स्फोट घडला असावा पण पाकिस्तान सेनेकडून याबाबत दुजोरा आला नाही. पाकिस्तान सेना मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे सैन्याचं हॉस्पिटल आहे. परंतु सेना आणि सरकारकडून प्रसार माध्यमांना स्फोटाचं वृत्तांकन करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मसूज अजहरबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र समाज माध्यमांवर संबंधित स्फोटाशी जोडलेले अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

ऑक्टोबर २०१७ मध्येही बलूचिस्तान या प्रांतात सूफी दर्गाहजवळ आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला होता तर २४ जण जखमी झाले होते.

हॅशटॅग्स

#Pakistan(20)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या