वचननाम्यात महिला सक्षमीकरण मुद्दा; दुसरीकडे मुलींना पळविण्याचं भाष्य करणाऱ्याला आशिर्वाद

मुंबई: “वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.
१० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलंय. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. तसंच अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला १०००० रुपये जमा करण्याचं वचन शिवसेनेनं दिलं आहे.
दरम्यान, मागील ५ वर्षात सत्तेला लाथ मारण्याच्या धमक्या देणारे मंत्री आणि आमदार यांनी राजीनामे खिशातच ठेवले. त्यात सेनेच्या १२ मंत्र्यांनी आणि ६३ मदारांनी मागील ५ वर्षात कोणती विकासाची कामं केली याचा कोणताही हिशेब उद्धव ठाकरे मतदाराला सभांमधून देताना दिसत नाहीत आणि केवळ भावनिक मुद्दे पुढे करून तीच तीच पोकळ आश्वासनं देताना दिसत आहेत. चंद्रपूरचे सेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी तर भर सभेत शिवसेनेच्या मंत्र्यांना बिनकामाचे असा शिक्का मारला होता आणि आता तेच बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये राज्यातील एकमेव खासदार आहेत.
त्यात मुंबईतील दहीहंडी उत्सवात लग्नासाठी मुलगी आवडली असेल तर मला सांगा, मी पळवून आणणार आणि तुम्हाला देणार असं धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदार राम कदम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी आशीर्वाद दिल्याचं ट्विट स्वतः राम कदम यांनी केलं आहे. विशेष म्हणजे आजच जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात शिवसेनेने महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे आणि त्यामुळे समाज माध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
वचननाम्यातील मुद्दे;
- फक्तं 10 रुपयांमध्ये जेवणाची सकस थाळी. त्याच कँटीनमध्ये 100 रुपयांपर्यंत जेवण मिळणार.
- गावातील विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा
- वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
- महिला सक्षमीकरणावर भर.
- महिला बच गटासाठी जिल्हास्तरावर कँटीन
- तिर्थक्षेत्र प्रवासासाठी समन्वयक केंद्रांची स्थापना
- खतांचे दर 5 वर्ष स्थीर राहतील, याची योजना
- नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीकविमा मिळणार
- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
- गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार
- ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष तरतूद
- घरगुती वापरातील विजेचे दर 30 टक्क्यांनी कमी करणार
- मुंबईच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा करणार
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN