16 December 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

गुडगावच्या हॉटेलमध्ये रुम नंबर ११७ मधून राष्ट्रवादीच्या ३ आमदारांना शिवसेना-राष्ट्रवादीने सोडवलं

MP Sanjay Raut, Shivsena, NCP, BJP

मुंबई: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि २० मंत्रिपद देण्याची ऑफर भारतीय जनता पक्षानं दिली असल्याची माहिती मी ऐकली आहे. पण, चंबळच्या डाकूंसारखी भारतीय जनता पक्ष वागत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना गुरगावमधील हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटका करण्यात आली आहे. बहुमत होतं तर दरोडेखोरी करण्याची गरज काय होती. भारतीय जनता पक्षाला आम्ही पुरून उरू. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आमचा आकडा त्यांच्यापेक्षा दहाने जास्त असेल,” असं म्हणत राऊत म्हणाले, सत्ता गेल्यास भारतीय जनता पक्षाचे नेते वेडे होतील. पण, आमचं सरकार आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना सांगून वेड्याची रूग्णालये सुरू करू,” असा टोला राऊत यांनी लगावला.

‘गुडगावच्या एका हॉटेलमध्ये ११७ रुम नंबरमध्ये राष्ट्रवादीच्या त्या ३ आमदारांना ठेवण्यात आलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं. तिथे या आमदारांना कोंडून ठेवलं होतं. त्यांच्यासाठी हरयाणाचे पोलीस आणि गुंड लोकं ठेवले होते. हे लोकशाहीला हितकारक नाही’, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी, ‘विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आमचा आकडा १० ने जास्त असणार’ असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ‘भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांनी जो पायंडा पाडला, तो यशवंतराव चव्हाणांच्या कार्याला मारक आहे. तुम्ही कितीही घोटाळे करा, पण विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमचा आकडा तुमच्यापेक्षा १०ने जास्त असेल’, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भारतीय जनता पक्षाशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनाही तातडीने गुजरातला हलविले आहे. चार ते पाच जणांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्याशी संपर्क साधू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

स्वपक्षाचे १०५ आमदार आणि १५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा अशी आकडेमोड भारतीय जनता पक्ष प्रथमपासून करीत आहे. दुसरीकडे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने सादर केलेल्या पत्रावर मात्र पक्षाच्या ४१ आमदारांच्या सह्या आहेत. यामुळे १३ आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील तर भारतीय जनता पक्षाकडील संख्याबळ १३३पर्यंत पोहोचते. त्यातच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा उर्वरीत १४ पैकी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचा हा डाव पुरता फासल्यात जमा आहे. शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भारतीय जनता पक्षाशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. कारण आता इतर छोट्या पक्षातील आमदार आणि अपक्ष आमदार देखील फुटले तर भारतीय जनता पक्षाची पंचायत होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील भारतीय जनता पक्षाच्या गोटातील आमदारांना स्वतःकडे खेचत असल्याचं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x