पुणे : भारतीय संघानं विराट कोहलीच्य नेतृत्वाखाली पुण्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवत मालिकेवर कब्जा केल आहे. भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० नं आपल्या नावावर केली आहे. यासोबत टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय संघानं घरच्या मैदानावर आतापर्यंत ११ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघाला १० पेक्षा जास्त मालिका घरच्या मैदानावर जिंकता आलेल्या नाहीत.

कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक (२५४ धावा), सलामीवीर मयांक अग्रवालचं शतक (१०८ धावा) तसेच रविंद्र जाडेजा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची परवा ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने पाहुण्या संघाला चौथा धक्का दिला. त्याने एनरिक नोर्टजेला कोहलीकरवी झेलबाद करत माघारी धाडले आणि पाहुण्यांची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली.

त्यानंतर ५३ धावसंख्या असताना थेयुनिस ब्रूयनला झेलबाद करत उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेचा पाचवा बळी टिपला. पुढे कर्णधार फाफ डुप्लेसी आणि क्विंटन डीकॉक जोडीने धावसंख्या शंभरपार नेली. मात्र धावसंख्या १२८ असताना डीकॉकचा अडसर अश्विनने दूर केला. उपहारावेळी कर्णधार फाफ डुप्लेसी ५२ धावा करून नाबाद होता. उपहारानंतरचा खेळ सुरू झाला आणि भारताने पाहुण्यांना लागोपाठ दोन धक्के दिले. आधी सेनुरन मुत्तुसामी आणि नंतर कर्णधार डुप्लेसी बाद झाला.

लंचनंतरच्या पहिल्याच षटकात रवींद्र जडेजानं विकेट घेत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर जडेजान आणखी एक विकेट मिळवून दिली. भारताला सातवे यश मोहम्मद शमीनं मिळवून दिलं. त्यानं एस मुथूसामीला बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा तो ३०० वा बळी ठरला आहे. शमीनं पहिल्या डावात २ विकेट घेतल्या होत्या. त्यानं कसोटीत १६१, वन डेत १३१ आणि ट्वेंटी-२०त ८ विकेट घेतल्या आहेत.

केशव महाराज आणि व्हेर्नोन फिलेंडर यांनी पुन्हा एकदा संयमी खेळ करताना भारताचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पण, ही जोडी तुटल्यानंतर भारतानं आफ्रिकेचा डाव १८९ डावांत गुंडाळला.

पुणे कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय