4 May 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

मुख्यमंत्री तेल लावल्यावर कसे दिसता जरा कळू द्या; तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा: जयंत पाटील

CM Devendra Fadnavis, NCP Leader Jayant patil

सांगली: तेल लावलेला पैलवान विषयावरून राष्ट्र्वादीने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधक कमजोर दिसत असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असं वाटू लागल्याने ते सभांमध्ये वारंवार त्याचा उल्लेख करत आहेत. युतीशी सामना करण्यासाठी तुल्यबळ विरोधकच शिल्लक न राहिल्याने निवडणूक एकतर्फी होणार आणि आमच्या विरुद्ध तूल्यबळ विरोधक म्हणजे पैलवानंच नसल्याचं मुख्यमंत्री टोला लगावत आहेत.

मात्र आता फडणवीसांच्या त्याच शब्दाचा उल्लेख करत एनसीपीने त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. ‘शरद पवार यांच्याविरोधात कट-कारस्थान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी जनता एकवटली आहे,’ असं म्हणत ईडीच्या मुद्द्यावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

‘आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे पैलवान आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो लावलेला प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर कसे दिसत आहेत,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेली खालच्या स्तरातील टीका महाराष्ट्र सहन करणार नाही,’ असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून काँग्रेस-एनसीपी आघाडीची सत्ता येणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. एनसीपीच्या प्रदेशाध्यक्षांच्या या दाव्याला भाजप आणि शिवसेना कसं उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x