19 April 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन

Covid19, Corona Crisis, Pimpari Chinchwad Corona

पुणे, ६ एप्रिल: पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

शनिवारी रिक्षाचालकाचा कोरोना तपासणी अहवाल आला. या अहवालामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रिक्षाचालकाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्या खासगी रुग्णालयात या रिक्षाचालकावर उपचार झाले होते. त्या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसंच, रिक्षाचालकाच्या १० नातेवाईकांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून आत्तापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी १२ जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. अशातच ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे ९३ डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

 

News English Summary: In Pimpri-Chinchwad city, a shocking pattern has surfaced, which has quarantined 43 doctors and 50 medical students. On March 31, the casualty’s abdominal surgery was performed by a doctor at a private medical college. The patient then had symptoms like fever, cold, cough. When the test report was sent to him immediately, it was shocking that he was Corona-positive.

 

News English Title: Story Pimpari Chinchwad 42 doctors and 50 health worker are quarantined Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x