6 May 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
x

सेना आली तर ठीक अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी; वानखेडे स्टेडियम बुक

CM Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray, MP Sanjay Raut

मुंबई: मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप झालेच पाहिजे, असे ठासून सांगताना, ज्या अर्थी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे म्हटले आहे, त्या अर्थी मी आपल्याला लिहून देतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठाम मत शिवसेनेचे प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने ठरवलं तर आपलं सरकार बनवू शकते असे म्हणत राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट इशारा दिला आहे.

शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये चर्चा योग्य दिशेनं जाऊन प्रश्न सुटावा हे महत्त्वाचं आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षामधला पेच सुटला पाहिजे. मुख्यमंत्री हे स्वतःला शिवसैनिकच मानतात, चर्चेतून प्रत्येक प्रश्न सुटणार आहे. ५०-५०च्या फॉर्म्युलाचा तिढा हा चर्चेतून सुटणार आहे. चर्चेतल्या मुद्द्यांच्या आधारावर अटीशर्थी घातल्या जातात. सर्वकाही चर्चा कशी होते, त्यावर ठरत असतं. तसेच येत्या काही दिवसांत १०० टक्के नवीन सरकार सत्तेवर येणार आहे, ठरावीक कालावधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. तर राष्ट्रपती शासन आणावं लागेल. महाराष्ट्रानं त्याग अन् सेवा शिकवली आहे. अशा महाराष्ट्राच्या हिताचा हा प्रश्न चर्चेतून नक्कीच सुटेल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून युतीमध्ये वाद सुरू आहे. भारतीय जनता पक्ष आणि सेनेत पडलेल्या सत्तेच्या ठिणगीमध्ये आता भारतीय जनता पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका मांडली आहे. मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भारतीय जनता पक्ष मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना सोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

या शपविधी कार्यक्रमाची सर्व जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. २०१४ प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथेच पार पडणार आहे. त्यामुळे आता यावर सेनेची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x