29 April 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये बिगर काश्मिरी मजुर दहशतवाद्यांचे लक्ष; हल्ल्यांमध्ये वाढ

Jammu Kashmir, Jammu, Article 370, Srinagar, Grenade Attack

श्रीनगर: जम्मू-काश्मीर येथे लाल चौकात दहशतवादी हल्ला झाला. ग्रेनेडचा हल्ला करुन दहशतवाद्यांनी लाल चौकाला लक्ष्य केले. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीटवर केला.

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर चिडलेल्या दहशतवाद्यांनी आता ट्रक ड्रायव्हर, व्यापारी आणि इतर राज्यांतील मजुरांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी मजुरांची हत्या केली होती. १५ दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी ४ ट्रक ड्रायव्हर, एक सफरचंदाचा व्यापारी आणि दुसऱ्या राज्यातून आलेल्या सहा मजुरांची हत्या केली आहे.

श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात आज दुपारी झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर तब्बल १५ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम राबविण्यात आली आहे. मागील १५ दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.

हॅशटॅग्स

#Kashmir(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x