4 May 2024 12:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मुंबईच्या महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या उमेदवार

Shivsena Corporator Kishori Pednekar, Shivsena, BMC

मुंबई: शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौर होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर काम केलं आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे.

किशोरी पेडणेकर या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. आजपर्यंत त्यांना एकही मोठ पद मिळालं नाही. मध्यतंरीच्या काळात एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या. पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरेंच्या प्रचारात त्यांचे महत्वाचे योगदान होते.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९४ संख्याबळ आहे. यामध्ये शिवसेनेतील इच्छुकांची यादी खूप मोठी होती. विधानसभा निवडणुकीत वरळीत प्रचाराची मेहनत घेणाऱ्या किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर या नगरसेवकांची वर्णी लागणार की अमेय घोले यांच्यासारखे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्यांना संधी मिळणार की मिलिंद वैद्य, मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर अशा अनुभवी नगरसेवकांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

तत्पूर्वी, मुंबईसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठीची लॉटरी बुधवारी काढण्यात आली असून, यंदा मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबईचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर म्हणून ओळखले जाणारे हे पद प्रतिष्ठेचे मानले जाते. अडीच वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदासाठी मुंबई महापालिकेत २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या पदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाने बुधवारी काढली. या सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील बळ वाढले आहे. राज्यातील सत्तासंघर्षापासून शिवसेनेचे महापौरपद सध्या सुरक्षित आहे. हे पद खुले झाल्यामुळे इच्छुकांची यादी वाढली आहे.

हॅशटॅग्स

#BMC(44)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x