6 May 2025 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
x

मोदी शहांनी यापुढे काँग्रेस-मुक्त भारताची कल्पनाही करू नये: काँग्रेस

Amit Shah, Narendra Modi, Congress

नवी दिल्ली: मागील लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याचा निर्धार अनेक सभांमधून केला होता. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मोदी-शहांना इशारा दिला आहे. यापुढे मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये, असे गहलोत यांनी म्हटले आहे.

मोदी, शहा यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याची कल्पनाही करू नये. कारण काँग्रेसचा डीएनए भारताच्या संस्कार, संस्कृती आणि परंपरेसोबत जुळलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतात एक आणि करतात एक हे आता जनतेला समजू लागले आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे, असे गहलोत म्हणाले. गहलोत हे नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गुजरात निकालानंतर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुकांनी पंतप्रधान मोदींना धडा शिकविला आहे. जनतेने त्यांना यापुढे काँग्रेसमुक्त भारताची गोष्टच न करण्याचे सुचविले आहे. काँग्रेस मुक्त भारत म्हणणारेच कधी ना कधी गायब होणार आहेत. काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नेहरुंसारखे नेते तुरुंगात गेले होते. गेल्या ७० वर्षांत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, त्याच उंचीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरात मान मिळतो. हे मागील ७० वर्षांतील प्रगतीमुळेच होत आहे. याला कोणी नाकारत असेल तर ते दुर्भाग्याचे आहे, अशी टीकाही गहलोत यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भारतीय जनता पक्षाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.

परंतु, नुकत्याच कर्नाटकात ४१८ प्रभागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पडल्या होत्या आणि त्याचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर कर्नाटकात काँग्रेसची हवा असल्याचं स्पष्ट झालं असून, राज्यात आणि केंद्रात सत्ता असून देखील भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसने ४१८ प्रभागांपैकी सर्वाधिक १५१ जागांवर विजय संपादित करून प्रथम क्रमांकावर पोहोचला. तर भारतीय जनता पक्ष एकूण १२५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

विशेष म्हणजे कर्नाटकात जनता दल सेक्युलरने एकूण ६३ जागा जिंकल्या. कर्नाटकातील ९ जिल्ह्यांतील महानगरपालिका आणि नगपालिकांचा समावेश होता. या निकालामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असून, भाजपाची चिंता वाढली आहे. कारण लवकरच विधानसभेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असल्याने त्यावर देखील या निकालांचा परिणाम जाणवणार असं स्थानिक राजकीय मत व्यक्त केली आहे.

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे. मात्र त्यात अजून एक भर पडली आहे कारण राजस्थानच्या शहरी मतदारांनीही ‘कमळा’ला अर्थात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नाकारल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमध्ये एकूण २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे, तर भारतीय जनता पक्षाला केवळ ६ ठिकाणी विजय मिळाला आहे. त्यातही २० जागांवर अन्य पक्ष आणि अपक्षांनी बाजी मारली आहे. ही कामगिरी मोदी आणि शहांची डोकेदुखी वाढवणारीच दिसत आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानातील सर्वच्या सर्व २५ जागांवर ‘कमळ’ फुललं मात्र त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही.

एकूणच मोदी लाट राजस्थानातून ओसरल्याचं चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. भरतपूर आणि बीकानेर महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला असला, तरी नगरपालिका/नगरपरिषदांमध्ये अजिबात समाधानकारक कामगिरी झाली नसल्याने मोदी आणि शहांची २०२४च्या अनुषंगाने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या ४९ पैकी तब्बल २१ ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, परंतु आता तो आकडा थेट ६वर घसरला आहे. याउलट, काँग्रेसच्या खात्यात दोन पालिका वाढल्या असून ते २३ वर पोहोचलेत. तब्बल २० ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या हाती सत्तेची किल्ली असणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या