10 May 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार
x

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख

BJP, Union Minister Ravi Shankar Maharashtra, Chattrapati Shivaji Maharaj

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक विजय झाला होता. मग शिवसेना पहिल्या दिवसापासून कुणाच्या इशाऱ्यावरुन वागत होती? असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का? असाही प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी विचारला.

तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती? महाविकासआघाडीने एकदा तरी सत्तेचा दावा राज्यपालांकडे केला का? असा सवाल भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी करत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट एकत्र येत सत्तेचा दावा केला. नवीन युती स्थिर सरकार देणार आहे असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर टीका करताना मोठी चूक केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chattrapati Shivaji Maharaj) वारंवार एकेरी उल्लेख केला. यानंतर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chattrapati Sambhajiraje) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रवीशंकर प्रसाद यांनी तातडीने माफी मागावी, अशी जाहीर मागणी संभाजीराजेंनी पत्राद्वारे केली. शिवाय राजकारण्यांनी शिवरायांचं नाव बदनाम करू नये, असं आवाहनही त्यांनी सर्वपक्षीयांना केलं.

हॅशटॅग्स

#Ravi Shankar Prasad(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x