29 April 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शरद पवार कार्यरत होताच भाजपने समर्थक अपक्ष आमदारांना तातडीने गुजरातला हलविले

BJP, NCP, Shivsena

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भाजपशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष गुजरातमध्ये भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनाही तातडीने गुजरातला हलविले आहे. चार ते पाच जणांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्याशी संपर्क साधू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

स्वपक्षाचे १०५ आमदार आणि १५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा अशी आकडेमोड भाजप प्रथमपासून करीत आहे. दुसरीकडे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने सादर केलेल्या पत्रावर मात्र पक्षाच्या ४१ आमदारांच्या सह्या आहेत. यामुळे १३ आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील तर भाजपकडील संख्याबळ १३३पर्यंत पोहोचते. त्यातच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा उर्वरीत १४ पैकी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. मात्र भाजपचा हा डाव पुरता फासल्यात जमा आहे. शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भाजपशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. कारण आता इतर छोट्या पक्षातील आमदार आणि अपक्ष आमदार देखील फुटले तर भाजपाची पंचायत होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील भाजपच्या गोटातील आमदारांना स्वतःकडे खेचत असल्याचं वृत्त आहे.

कोणाच्या ध्यानीमनी नसताना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ऐतिहासिक युती झाली आणि विशेष म्हणजे शिवसेना एनडीए’मधून देखील बाहेर पडत भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेली असताना पाहून भाजपचे केंद्रीय नैतृत्व देखील विचारात पडलं आहे. यासर्व राजकीय उलथापालत शक्य झाल्या त्या केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच हे सर्वश्रुत आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x