खुशखबर! तरुणांसाठी सरकारी नोकरीची ऑनलाईन तयारी महाराष्ट्रनामावर मोफत

मुंबई: राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या विविध भरती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांची सर्व प्रक्रिया एकाच पोर्टलच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने स्वतंत्र “महापरीक्षा” हे पोर्टल (Mahapariksha Portal) तयार केले आहे. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल असा सरकारने आदेश काढला होता. त्यानुसार सरकारी परीक्षांसाठी या पोर्टलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC – Maharashtra Public Service Commission) , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांसह अन्य यंत्रणांमार्फत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येतात. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षासह (सीईटी सेल) इतर अभ्यासकांच्या प्रवेश प्रक्रिया संबंधित विभागाकडून राबविल्या जातात. बहुतेक भरती परीक्षा ऑफलाईन म्हणजे लेखी स्वरूपात घेतल्या जातात. उमेदवारांना ‘ओएनआर’ शीटवर उत्तरे भरावी लागतात. या प्रक्रियेत बऱ्याचदा गोंधळ निर्माण होतो. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी, या उद्देशाने आयटी विभागाने “महा परीक्षा” हे स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.
सार्वजनिक कंपनी, सोसायट्या, सरकारी महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीदेखील याच पोर्टलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. संगणक आधारित परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी २५० रुपये तर ओएमआर आधारित परीक्षेसाठी २२५ रुपये शुल्क आकारले जाते असे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.
मात्र असं असलं तरी या पोर्टलवर विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, उमेदवारांनी तसेच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींनी राज्यभर आंदोलनं करत सदर पोर्टल बंद करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला होता, मात्र त्याने काहीच फायदा होताना दिसला नाही. वास्तविक ग्रामीण भागातील तरुणांना हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी देखील प्रचंड अडचणी येतात असं देखील आमच्या निदर्शनास आलं आहे आणि राज्यातील लाखो तरुण-तरुणींना ऑनलाईन अभ्यास करता यावा यासाठी आम्ही महाराष्ट्रनामा न्युज पोर्टलवर सरकारी नोकरीचा अभ्यास करण्याची सोया करून देतो आहोत. लवकरच महाराष्ट्रातील पोलीस भरती (Maharashtra Police Bharti) तसेच इतर परीक्षा पार पडणार आहेत. तरी तरुणांनी नक्कीच या सेवेचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील याबद्दल माहिती द्यावी ही विनंती.
सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास हा आमच्या सामाजिक उपक्रमाचा भाग असून, समाजाप्रती आमची जवाबदारी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. तरी सर्व तरुणांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आणि इतरांना देखील त्याबद्दल माहिती द्यावी ही विनंती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN