27 April 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार
x

फडणवीस सरकारने दडपशाही करून गुन्हे लादले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागे घेतले

Save Aarey, Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई: फडणवीस सरकारने दडपशाही मार्गाने आरे’तील आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर धडाडीने निर्णय घेण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण कोणत्याही विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नाही, असे सांगतानाच ठाकरे यांनी येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडऴ विस्तार करणार असल्याचे सांगितले. तसेच मी आणि सहा मंत्री एकत्र बसून निर्णय घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होती. आता आम्ही मोकळे झालेलो आहोत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x