1 May 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

मी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी

डोंबिवली : डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

त्याच संवादा दरम्यान उत्तर देताना विकासाच्या मुद्याला धरून गडकरी असे म्हणाले की, डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर असून इकडे घाण, अनधिकृत बांधकाम आणि अरुंद रस्ते हेच त्याला कारणीभूत असून ते इथल्याच लोकप्रधिनिधींच्या आशीर्वादाने होत आहे असे सांगून स्वपक्षीय नेत्यांचेच कान उपटले.

एका विद्यार्थ्याने गडकरींना प्रश्न केला की, आमचं डोंबिवली शहर मुंबईच्या इतके जवळ असताना शहराचा विकास का खुंटला आहे ? इथे भविष्यात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी का लागत नाहीत ? असे प्रश्न गडकरींना विचारले असता त्या उत्तराची सुरुवातच करताना डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं एक घाणेरडे शहर असल्याचा उल्लेख केला.

पुढे नितीन गडकरी असं ही म्हणाले की, डोबिवलीतील लोकं इतकी चांगली आहेत, पण घाण, अरुंद रस्ते आणि अनधिकृत बांधकाम यामुळे शहर बकाल झाले असून त्याला स्थानिक लोकप्रधिनिधींचाच आशीर्वाद असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उलट प्रश्न केला की, जे प्रतिनिधी शहराचा विकास करू शकत नाहीत त्यांना निवडूनच का देता असे म्हणत ही लोकांचीच चूक असल्याचे गडकरी चर्चे दरम्यान म्हणाले.

नागपूरच्या विकास कामांचं उदाहरण देताना नितीन गडकरी म्हणाले की नागपुरातील रस्ता रुंद करण्यासाठी मी माझ्या सासऱ्यांच घर पाडलं होत. त्यानंतर मला सुद्धा घरात बायकोची नाराजी सोसावी लागली होती. त्यामुळे विकास कामात आणि विशेष करून रस्ता रुंदीकरणात बऱ्याच मालमत्तांवर बुलडोझर फिरवताना अनेकदा हितसंबंध दुखावले जातात, परंतु विकास हा आवश्यक आहे असे गडकरी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले.

मुळात कल्याण-डोंबिवलीत भाजप- शिवसेनेची सत्ता असल्याने गडकरींनी केलेल्या या विधानाने डोंबिवलीतील भाजप शिवसेना नेत्यांना खळबळ माजली आहे. तर डोंबिवली शहराला एक घाणेरड शहर असं वक्तव्य केल्याने डोंबिवलीकरांचा स्वाभिमान दुखावला गेल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. त्यातच भाजपचे स्थानिक आमदार रवींद्र कदम हे राज्य मंत्रिमंडळात असल्याने गडकरींच्या स्पष्ट वक्तेपणाने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा स्थानिक राजकारणात चालू झाली आहे. तरी शहराच्या विद्रूपीकरणात लोकांची काहीच चूक नसून गडकरींनी आधी स्वपक्षीय नेत्यांना कामाचे धडे द्यावेत अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्य डोंबिवलीकर देत आहेत.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x