9 May 2025 6:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL Mazagon Dock Share Price | युद्धाचे ढग, डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत, मिळेल मोठा परतावा - NSE: MAZDOCK Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO
x

दिल्लीतील धान्य बाजार परिसरात भीषण आगीमुळे ३५ जण मृत्युमुखी

35 Dead in Fire Incident at Delhi

नवी दिल्ली: दिल्लीतील धान्य बाजार परिसरात लागलेल्या भीषण आगीत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळाले असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.

या भीषण आगीमधून अनेकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळावर होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यानं सांगितले आहे.

दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरात आज पहाटे हे भीषण अग्नितांडव घडले. या परिसरात असलेल्या एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. हा भाग दाटीवाटीचा असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले.

 

35 Citizens Dead and Many Injured in Huge Fire Incident at Delhi Rani Jhansi Road

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या