29 April 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत: खासदार संजय राऊत

Union Home Minister Amit Shah, Shivsena MP Sanjay Raut, Citizenship Amendment Bill 2019

नवी दिल्ली: लोकसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं. शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर चर्चाही सुरू झाली. ही चर्चा सहा तास चालणार असून त्यानंतर मतदान होणार आहे. अमित शहा यांनी विधेयक मांडतांना आक्रमकपणे आपली बाजू मांडली. लोकसभेत शिवसेनेने या बिलाला पाठिंबा दिला होता. नंतर मात्र भूमिका बदलत राज्यसभेत या बिलाला विरोध करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या प्रश्नावर शिवसेनेचे नेते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडत अमित शहांना चांगलेच टोले लगावले.

तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे आमचे हेडमास्तर आहेत, असं विधान त्यांनी यावेळी केलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत भारतीय जनता पक्षावर टिकास्त्र सोडले. लोकशाहीमध्ये विरोधाचाही आवाज असतो. त्याची दखल घेतली पाहिजे. ज्या लोकांचा या विधेयकाला विरोध आहे, ते देशद्रोही आणि ज्यांचा पाठिंबा आहे ते देशभक्त असल्याची टीका केली जात आहे. ही भारतीय संसद आहे. पाकिस्तानची असेंम्बली नाही. तुम्हाला पाकिस्तानची भाषा आवडत नसेल तर पाकिस्तानला नेस्तनाबूत करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं राऊत म्हणाले.

हे विधेयक धार्मिक नाही. पण या विधेयकावर मानवतेच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली पाहिजे. शरणार्थी आणि घुरखोरांमध्ये काही फरक आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील आमच्या बांधवांच्या अधिकारांचं हनन होत आहे. पाकिस्तानची भाषा आम्हाला मंजूर नाही. पाकिस्तानामध्ये जबरदस्ती धर्मांतरण करण्यात येतंय असं म्हणत देशातल्या घुसखोरांना बाहेर काढणार का? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला.

 

Web Title:  Shiv Sena Rajyasabha MP Sanjay Raut on Citizenship Amendment Bill 2019 in Rajya Sabha Union Home Minister Amit Shah

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x