28 April 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

CAB २०१९: नागरिकत्व नसलेल्या भारतासहित पाकिस्तान-बांगलादेशी हिंदूंची नाचगाणी

CAB 2019, Pakistani, Bangaladeshi

मुंबई: राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले.

जगभरातील विकसित देशात राहणाऱ्या हिंदूंना यामुळे काही फरक पडेल असं चित्र नसलं तरी पाकिस्तान, बांगलादेश अशा मागासलेल्या देशात हेटाळणी झालेले हिंदू मोठ्या प्रमाणावर भारताकडे फिरण्याची शक्यता असून त्यामुळे एकूण लोकसंख्येवर देखील त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काहींनी तर हे केवळ स्वतःचा मतदार वाढविण्याचं साधन असल्याचं म्हटलं आहे आणि भारतात राहणाऱ्या किती पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना मोदी सरकार बाहेरचा रस्ता दाखवणार हे देखील प्रश्नचिन्हं आणणारं आहे आणि सरकारच्या एकूण हेतूवरच अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

विशेष करून सध्या प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तानुसार सदर बिल राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर भारतासोबत पाकिस्तान आणि बांगलादेशमधील स्थायिक किंवा झिडकारलेले हिंदूच नाचून स्वागत करताना दिसत आहे, मात्र विकसित देशातील हिंदू भारतीयांना याचं काही पडलं आहे असं प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यामुळे याचे अजून कोणते विपरीत परिणाम होणार आहेत ते येणार काळच ठरवेल.

दरम्यान, दिल्लीत मोठ्याप्रमाणावर पाकिस्तानातील हिंदू वास्तव्यास आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणूक देखील तोंडावर असल्याने त्याचा देखील परिणाम होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. दिल्लीतील विविध भागात राहणारे पाकिस्तानातील हिंदू शरणार्थीं कानात प्राण आणून पाहत होते. हे विधेयक जसे मंजूर झाले तसे या शरणार्थींच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे विधेयक मंजूर झाल्याच्या आनंदात एका शरणार्थी महिलेने आपल्या दोन दिवसांच्या मुलीचे नाव ‘नागरिकता’ ठेवले.नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा असल्याचे ही महिला आनंद व्यक्त करताना म्हणाली.

 

Web Title:  After CAB 2019 Approved in Rajya Sabha Pakistani and Bangladeshi HIndu Celebration Stared

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x