काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार
मुंबई: राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भारतीय जनता पक्ष नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ मंजुरीवेळी सभात्याग करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला. देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. परंतु, आज त्यांच्याच शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले. त्यामुळे आता शिवसेना शेलारांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याचबरोबर, आशिष शेलार यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भारतीय जनता पक्षामुळे झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच, या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. “काहींचा विरोध होता.. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले.. काहीजण “जनपथला” घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!” असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता,त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको?अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते.
रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 11, 2019
नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर!! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. गृहमंत्री अमितभाईं शाह यांचे अभिनंदन!!!
जगभरातील हिंदूना आता भारत हे आश्रयस्थान भाजपमुळेच झाले.काहींचा विरोध होता..
काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले..
काहीजण “जनपथला” घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 11, 2019
Web Title: Shivsena party Leaders Escape From Rajya Sabha During Citizenship Amendment Bill 2019 Voting Due To Congress Says BJP MLA Ashish Shelar
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News