9 May 2024 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भेट

Opposition Leader Devendra Fadnavis, Eknath Khadse

जळगाव : भारतीय जनता पक्षामधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जळगावातील जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही मोठी राजकीय भेट झाली. यावेळी तिघांनीही एकत्र न्याहरी केली.

मात्र या चर्चेदरम्यान खडसे यांनी आपल्या नाराजीबद्दल मौन बाळगले आहे. देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली सभा घेण्यासाठी जळगावात आले होते. माझ्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही असं खडसे यांनी सांगितलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावं पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही’ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर आपल्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली होती. त्याच सभेत माझा काही भरवसा नाही मी कधीही पक्ष सोडू शकतो असंही खडसे म्हटले होते. एवढी सगळी नाराजी समोर आलेली असताना खडसे आणि फडणवीस भेट महत्त्वाची मानली जाते आहे. गिरीश महाजन यांनीही भारतीय जनता पक्षात सारंकाही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title:  Opposition Leader Devendra Fadanvis and Eknath Khadse meeting at Jalgaon.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x