4 May 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मास्टमाईंड देवडीकरला बेड्या ठोकल्या

Rushikesh Deodikar, Gauri Lankesh Murder Case

बेंगळुरू:  ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४ वर्षे) याला अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असून तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्ये प्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ऋषिकेश मागील सहा महिन्यांपासून प्रदीप खेमका यांच्या पेट्रोल पंपवर नोकरी करत होता. आपण बेरोजगार आणि साधक असल्याचं त्यानं नोकरी मागताना सांगितलं होतं, अशी माहिती खेमका यांनी पोलिसांना दिली. पेट्रोल पंपवर नोकरी करताना त्यानं स्वत:बद्दल कोणालाही फारशी माहिती दिली नाही. त्यामुळे कोणालाही त्याच्याबद्दल संशय वाटला नाही. खेमका यांनी या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन पोलिसांना दिलं आहे. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा सिनियर प्लॅनर होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी २८ ऑगस्टला दिली होती. गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात एकाच दुचाकीचा वापर केला असल्याच्या माहितीवरून कर्नाटक एसआयटी मंगळवारी महाराष्ट्रात गाडीच्या तपासणीसाठी दाखल झाली होती.

दरम्यान, दि. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. तीन हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी लंकेश एक पत्रकार होत्या, कन्नडमधील ‘लंकेश पत्रिके’च्या त्या संपादक. या वेगळ्या वृत्तपत्राची सुरुवात त्यांचे वडील पी. लंकेश यांनी १९८० मध्ये केली होती. ‘लंकेश पत्रिके’ हे व्यावसायिक वृत्तपत्र नव्हते. आंदोलनकारी विवेकवादी विचारसरणीच्याच बाण्याने त्यांची पत्रकारिता प्रेरित होती.

 

Web Title:  Key suspect Rushikesh Deodikar in Gauri Lankesh Murder Case Arrested in Jharkhand State.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x