भारत निर्मित कोरोना लस येण्यास कमीतकमी वर्ष लागणार - ICMR
नवी दिल्ली, २५ मे : भारतात आयसीएमआर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून कोरोनाला रोखणारी लस विकसित करत आहेत. कोरोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टियुट ऑफ वायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड म्हणजे बीबीआयएलकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
“कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित झाल्यानंतर सर्वप्रथम आधी प्राण्यांवर चाचणी केली जाईल. त्यानंतर मानवी चाचण्या सुरु होतील. लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी आहे ते या चाचण्यांमधून सिद्ध होईल. या सर्व प्रक्रियेला एक वर्ष लागेल” असे आयसीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. बीबीआयएल व्हायरसला संपवणारी लस विकसित करत आहे. ही लस टोचल्यानंतर शरीरात इन्फेक्शन विरोधात अँटीबॉडी तयार होईल.
सिरम इन्स्टियुट, काडिला, इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड आणि भारत बायोटक या चार कंपन्या लस विकसित करत आहेत. दरम्यान, कोरोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला होता.
विलियम हेसलटाइन, असं या शास्त्रज्ञांचं नाव आहे. विलियम हे कर्करोग, एचआयव्ही/एड्स आणि मानवी जीनोम प्रकल्पांसंदर्भात काम करतात. ‘रॉयटर्स’शी बोलताना विलियम म्हणाले,”करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजिकच्या काळात लस तयार होण शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा,” असा सल्ला त्यांनी दिला होता.
News English Summary: In India, ICMR Indian Council of Medical Research and Bharat Biotech International Limited are developing a vaccine to prevent corona. The strains removed from the corona virus were placed in the lab of the Indian Council of Medical Research’s National Institute of Virology in Pune.
News English Title: In india ICMR and BBIL is making covid 19 vaccine on corona virus News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA