बेरजेच्या राजकारणावरून मनसे नेत्यांचा सुरात सूर; संदीप देशपांडेंचं 'बेरजेवर' ट्विट

मुंबई: देशातील एकूण राजकरण बदललं आहे, मात्र ध्येय धोरणांमध्ये गुरपटलेली मनसे तत्वांच्या आड नेहमीच पक्ष फायद्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आल्याने, आज मोठी राजकीय किंमत मोजत आहे. पक्षाचं नुकसान आणि पक्ष संपला तरी चालेल, पण समाज माध्यमांवर आम्ही तोंडघशी पडताकामा नये अशाच अविर्भावात मनसेचे कार्यकर्ते अनेकदा वावरताना दिसतात. आपण एक राजकीय पक्ष आहोत की समाज सेवी संस्था याचा अजून कारकर्त्यांनाच उलगडा झालेला दिसत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ज्याप्रमाणे नैतृत्व घेईल तो निर्णय पक्ष हिताचा समजून, केवळ बेरजेचं राजकरण समजून घेतात ते मनसेच्या कार्यकर्त्यांना स्वीकारताना अत्यंत कठीण असल्याचं दिसतं.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपी’सोबत युती करून सर्व ध्येय धोरणं धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं, मात्र भाजपचे कार्यकर्ते त्यानिर्णयात देखील पक्षासोबत राहिले आणि कारण एकंच होतं ते म्हणजे बेरजेच्या राजकारणात पक्ष वाढतो आहे. बिहारच्या निवडणुकीत जेडीयू (सेक्युलर) सोबत छत्तीसचा आकडा आणि ध्येय धोरणं वेगळी असताना देखील भाजपने युती करून संसार थाटला आणि त्याचं मुख्य कारण होतं बेरजेचं राजकरण. कारण त्यामुळे नितीश कुमार आणि भाजप सत्तेत टिकून राहिले आणि पक्ष टिकला.
महाराष्ट्रात देखील सध्या महाविकास आघाडीने जन्म घेतला आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे ध्येय-धोरणं बाजूला करून सत्तेत टिकून राहणं आणि पक्ष टिकवून त्याचा विस्तार करून घेणं हाच आहे. केवळ शिवसेना नव्हते तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने देखील स्वतःचा सेक्युलर मुखवटा बाजूला ठेवत शिवसेनेसोबत संसार थाटला, इतकंच काय तर गेम फसला तरी भाजपने अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादीसोबत संसार थाटालाच होता आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे बेरजेचं राजकरण करत महाराष्ट्राच्या सत्तेत स्वतःला टिकवून ठेवणं हाच होता.
अर्थात मनसेचा आक्रमक दिसणारा कार्यकर्ता थोडा भावुक देखील असल्याने त्यांना पक्ष नैतृत्वाने घेतलेले बेरजेच्या गणिताचे निर्णय देखील पचवता येतील का यात शंका आहे. कारण, मनसेच्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना आपण राजकीय पक्ष आहोत हेच मान्य नसावं आणि त्यामुळे ते चिरंतर समाजसेवेत तल्लीन होऊन, निवडून न देणाऱ्या मतदारांसाठी अंगांवर खटले लादून घेत आहेत आणि त्याचे समाज माध्यमांवर प्रदर्शन मांडून जास्तीत जास्त लाइक्स कशा मिळतील यासाठी मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आपण नेमकं कोणासाठी आणि काय साध्य करत आहोत याचं त्यांना भान नसल्याचं दिसतं. मनसेच्या समाज माध्यमांवरील अनेकांना तर आघाडी-युती अशा विषयांबद्दल इतकी घृणा आहे की, ‘आमचं आम्ही बघू आणि आम्हाला कोणाची गरज नाही’ ह्या त्यांच्या नित्त्याच्या प्रतिक्रिया. कारण पक्ष संपला तरी चालेल, पण समाज माध्यमांवर आमची मान खाली झुकताकामा नये यालाच ते राजकारण समजतात. मात्र वरिष्ठ नेत्यांमध्ये काही दिवसांपासून बेरजेच्या राजकारनावरून एक वाक्यता पाहायला मिळत आहे.
सध्याच्या चर्चांप्रमाणे जरी मनसेने हिंदुत्वाकडे वाटचाल केली तरी त्याचा अर्थ मनसेने कोणाशी युती केली असा अजिबात अर्थ होणार नाही. कदाचित मराठीची व्याख्या ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी एका भाषणात मांडली होती, तशीच ते कदाचित हिंदुत्वाच्या बाबतीत देखील मांडण्याची शक्यता आहे. त्यात आपण हिंदुत्वाच्या अजेंडयावर चालणं म्हणजे इतर धर्मांचा द्वेष करणं असा समज अनेकांनी करून घेतला असावा. मुळात मराठी देखील हिंदूच आहेत आणि मनसेने आज पर्यंत मराठी केंद्रित हिंदुत्वाचा म्हणजे गणेश मंडळांना मंडप घालू न देण्यावरून आंदोलनं, दहीहंडी उत्सवांवर निर्बंध घालण्यावरून सरकारला धारेवर धरून दहीहंडी मंडळांच्या पाठीशी उभं राहणं आणि असे अनेक हिंदुत्वाचे मुद्दे त्यांनी उचलून धरल्याचे सर्वश्रुत आहे. त्याला अपवाद ठरलं होतं ते आझाद मैदानातील रझा अकादमीच्या मोर्चानंतर उसळलेला वाद आणि राज ठाकरे यांनी घेतली कट्टर हिंदुत्वाची भूमिका. मात्र आता बदलत्या राजकीय परिस्थितीत त्या हिंदुत्वाला व्यापक स्वरूप देण्याची वेळ आली आहे असं पक्षाला वाटलं असावं. कारण त्यामुळेच पक्षाला निवडणुकीत युती किंवा आघाडीचे दरवाजे खुले होतील. त्याचं कारण म्हणजे युती किंवा आघाडी ही केवळ पारंपरिक मतदार असणाऱ्या पक्षांसोबतच केली जातो, जो मनसेकडे नाही.
मागील काही दिवसांपासून मनसेचे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी बेरजेच्या राजकारणाला महत्व आल्याचं स्वीकारून बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार पक्षाने बदल करणं आवश्यक असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. त्यानंतर आता संदीप देशपांडे यांनी देखील तशीच सामान्य असणारी भूमिका घेतली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “माझं वैयक्तिक राजकीय निरीक्षण “सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्वाची. नाहीतर काँग्रेस शिवसेने बरोबर गेली नसती आणि भाजपनी राष्ट्रवादी बरोबर दोन दिवसांची सोयरीक केली नसती”.
माझं वैयक्तिक राजकीय निरीक्षण “सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्वाची. नाहीतर काँग्रेस शिवसेने बरोबर गेली नसती आणि भाजपनी राष्ट्रवादी बरोबर दोन दिवसांची सोयरीक केली नसती”
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 10, 2020
त्यामुळे नेते परिस्थितीनुसार वास्तव स्वीकारत आहेत, पण कार्यकर्ते ते स्वीकारतील का जसं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केवळ बेरजेचं राजकारण बघितलं हाच मुळात कळीचा मुद्दा आहे.
Web Title: MNS Leader Sandeep Deshpande Twit over alliance and beneficial Math for MNS.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH