12 August 2020 2:34 PM
अँप डाउनलोड

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर

Shivsena, Kishori Pednekar, Suhas Wadkar, BMC

मुंबई: विद्यमान महापौर, उपमहापौर यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यानुसार मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज पालिका मुख्यालयात निवडणूक झाली. या निवडणुकीत मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

गिरणी कामगारांच्या कुटुंबातून असलेल्या किशोरी पेडणेकर या कट्टर शिवसैनिक आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात त्या अग्रेसर असतात. परिचारिकेचे शिक्षण घेतलेल्या किशोरी यांची नगरसेविका पदाची ही तिसरी वेळ आहे. स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, सुधार समिती या समित्यांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी दावा केला होता. यशवंत जाधव, मंगेश सातमकर यांसारख्या स्थायी समितीच्या सदस्यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेकडून महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(900)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x