2 May 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुंबईत २६ जानेवारी रोजी संविधान बचाव सत्याग्रह.

मुंबई : मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सर्वपक्षीय आणि अनेक सामाजिक धुरिणांनी ‘संविधान बचाव सत्याग्रह’ आंदोलन पुकारलं आहे. या लॉंग मार्च मध्ये हार्दिक पटेल, शरद पवार, सीताराम येचुरी यान सारखे बडे राजकारणी आणि अनेक समाजसेवक उपस्थित राहणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून हा संविधान बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे.

या मोर्च्याला स्वतः राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तुषार गांधी, सीताराम येचुरी, शरद यादव, गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर, पाटीदार नेता हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायाधीश बी . जी. कोळसे पाटील आणि गणेश देवी अशी बडी नावे आपली उपस्थिती दाखवणार आहेत.

२६ जानेवारीला मार्च पूर्ण झाल्यावर २ तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे, परंतु काँग्रेस कडून उपस्थितीबद्दल अजून पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया कळू शकली नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x