29 April 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी करता येणार नाही

MLA Bacchu Kadu, Jai Bhagwan Goyal

नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.

दरम्यान, मंत्री बच्चू कडू यांनी देखील भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांना यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले कि, ‘पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी करता येणार नाही’.

तत्पूर्वी जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपाला नेमकं प्रत्युत्तर दिलं ते देखील समोर आलं आहे. तसेच साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण त्या पुस्तकात नेमकं काय छापलं आहे ते तपासून प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे. तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमधील अति उत्साही पदाधिकाऱ्यांना आवरा असं म्हटलं आहे.

 

Web Title:  MLA Bacchu Kadu slams BJP Over book Aaj Ke Shivaji Narendra Modi inaugurated by Jai Bhagwan Goyal.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x