29 April 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

CAA: भारतातील सध्याची परिस्थिती वाईट: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला

Microsoft CEO Satya Nadella, PM Narendra Modi, CAA, Citizenship Amendment Act 2019

वॉशिंग्टन डीसी: भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दररोज आंदोलने होत असताना आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही याविषयी मत व्यक्त केले आहे. भारतात या कायद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनावरून त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

बझफीडचे प्रमुख बेन स्मिथ यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. स्मिथ यांनी म्हटले आहे, की सत्या नडेला यांना भारतात लागू करण्यात आलेल्या सीएए विषयी विचारले असता त्यांनी भारतात सुरु असलेले आंदोलन दुःखद असल्याचे म्हटले आहे. भारतात हे काही होत आहे ते चुकीचे आहे. जर एखादा बांगलादेश निर्वासित भारतात इन्फोसिससारख्या एखाद्या कंपनीचा सीईओचा झाल्यास मला आनंदच होईल.

नडेला यांनी आपले स्वत:चे उदाहरणदेखील दिले. आपण एका जागतिक कंपनीचे सीईओ आहोत. त्याचे श्रेय हे भारतातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराला आणि अमेरिकेच्या इमिग्रेशन पॉलिसीला जात असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले. त्यांनी भारतातील सर्वसमावेशक संस्कृतीचाही उल्लेख केला. उदारमतवादी मूल्यांमुळे भांडवलशाहीला बळ मिळते. भारत सरकारलाही ही बाब ठाऊक असेल असेही त्यांनी म्हटले.

नडेला यांनी मॅनहॅटन येथे झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात आपले मत मांडले आहे. अमेरिकेतील सर्वांत मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ते सीईओ आहेत. याबरोबरच भारतीय वंशाचे सुंदर पिचई हे सध्या गुगलचे नेतृत्व करत आहेत.

“प्रत्येक देशाने आपल्या सीमा ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक देश आपले राष्ट्रीय सुरक्षा धोरण ठरवून त्याप्रमाणे निर्वासितांसाठी धोरणे ठरतो. लोकशाहीमध्ये हे सर्व निर्णय त्या राष्ट्राचे लोक आणि तेथील सरकार चर्चा आणि वादविवादाच्या माध्यमातून नियमांमध्ये राहून घेतात. माझ्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. सांस्कृतिक वैविध्यता असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये जन्मल्यानंतर मी अमेरिकेमध्ये आलो. भारत हा असा देश हवा जिथे निर्वासित व्यक्ती येऊन एखादी कंपनी सुरु करेल आणि तिची भरभराट होईल किंवा निर्वासिताने सुरु केलेल्या कंपनीचा देशाला आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशी माझी इच्छा आहे,” असं नाडेला म्हणाले.

 

Web Title:  Whats happening in India is sad Microsoft CEO Satya Nadella on New Citizenship Amendment Act 2019.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x