27 April 2024 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

फडणवीसांनी देखील मोदींची तुलना महाराजांशी केली होती; सचिन सावंत यांनी ट्विट केला व्हिडिओ

Congress Spokesperson Sachin Sawant, Devendra Fadnavis, narendra Modi, Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई: ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

यावेळी त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जयभगवान गोयल यांच्या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात झाले होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील एक भक्कम नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताचा लौकिक संपूर्ण जगात वाढत आहे. २०१४च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच केला होता आणि शिवछत्रपतींच्याच मार्गाने आपली वाटचाल असेल, असे स्पष्ट केले होते. त्यांना शिवछत्रपतींच्या मार्गावर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मात्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. सचिन सावंत यांनी एक देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा १२ जानेवारी २०१७ मधील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये फडणवीस महाराजांची आणि महाराजांच्या मावळ्यांची अनेक उदाहरणं भाषणात देऊन त्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करताना दिसत आहे.

 

Web Title:  Congress Spokesperson Sachin Sawant slams Devendra Fadnavis over comparing Modi with Chhatrapati Shivaji Maharaj.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x