7 May 2024 9:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

RNA ग्रुपच्या ४०० कर्मचाऱ्यांचे २ वर्षाचे पगार थकले; कामगारांचं राज ठाकरेंना पत्र

Raj Thackeray, RNA Groups

मुंबई : आरएनए ग्रुपच्या सुमारे ४०० कर्मचारी-कामगारांना मागील २ वर्षं पगार मिळालेला नाही. आपल्या हक्काचे पैसे व देणी कंपनीकडून मिळवण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. अखेर आरएनए ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच पत्र लिहून या प्रकरणात “न्याय मिळवून द्या तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवकणूक व दमदाटी करणाऱ्या आरएनए मालकाला धडा शिकवावा”, अशी विनंती केली आहे.

आरएनए ग्रुप ही मुंबईतील एक मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. या कंपनीच्या कर्मचा-यांना फेब्रुवारी २०१८ पासून पगार मिळालेला नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचा-यांना कंपनीच्या मालकाने दमदाटी करून नोकरी सोडण्यास भाग पाडले, तर आर्थिक मंदी असल्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळणं शक्य नसल्यामुळे अनेकजण पगार मिळत नसतानाही काम करत राहिले. पीएफ, ग्रॅच्युइटी आणि फाॅर्म १६ ची थकबाकीसुद्धा कर्मचा-यांना मिळालेली नाही. ह्यासंदर्भात आरएनए कंपनीचे संचालक अनुभव अग्रवाल आणि गोकुळ अग्रवाल ह्यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही ते कर्मचा-यांना कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कर्मचा-यांनी कामगार न्यायालय तसंच नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्यूनल (NCLT) येथेही पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून कंपनीच्या सुमारे २०० कर्मचा-यांनी लेखी पत्राद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनाच साकडं घातलं आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या थकबाकीची रक्कम २० कोटी इतकी आहे.

ह्याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक म्हणाले, “मे २०१४मध्ये आरएनए ग्रुपचे संस्थापक अनिल अग्रवाल ह्यांचं निधन झाल्यानंतर कर्मचा-यांचा पगार देण्यात अनियमितता येऊ लागली. २०१६मध्ये तर कर्मचा-यांना तब्बल ६ महिने पगारच मिळाला नव्हता. फेब्रुवारी २०१८नंतर तर कर्मचा-यांना अजिबात पगार मिळालेला नाही. त्यामुळे ह्या कर्मचा-यांना घरचा खर्च चालवणंही कठीण झालं आहे. अखेर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांना पत्र लिहिलं.”

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी आणि चिटणीस केतन नाईक ह्यांच्याकडे आरएनए ग्रुपचे कर्मचारी आपली समस्या घेऊन आल्यानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती करणारं पत्र लिहिलं तसंच, ‘मनकासे’चं सदस्यत्व स्वीकारलं.

 

Web Title:  RNA groups hold the salary of 400 employees since last two years and now employees sent letter request letter to Raj Thackeray.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x