5 May 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटकात अटक; राऊत आज बेळगावात

Minister Rajendra Patil Yadravkar, Karnataka Police

कोल्हापूर: काल कडेकोट बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना चकवा देत राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बेळगावात सीमा लढय़ातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. बेळगावपर्यंतच्या प्रवासात चकवा देण्यात यशस्वी ठरलेल्या यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडले. प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांचे कडे भेदून पुन्हा एकदा शिवसेनेने यड्रावकरांच्या रूपाने बेळगावात धाव घेतली. दरम्यान, बेळगावसह सीमाभागात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

विशेष म्हणजे सुरुवातीला बेळगाव पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तसेच संजय राऊत बेळगावमध्ये आल्यास करवाईचाही इशारा दिला होता. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्रात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. आयोजक आणि संजय राऊतही कार्यक्रम घेण्यावर ठाम राहिले. यानंतर बेळगाव पोलिसांनी अखेर परवानगी दिली. संजय राऊत आज सायंकाळी ४ वाजता बेळगावात पोहचतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे.

भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी १७ जानेवारी १९५६ यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.

 

Web Title:  Shivsena MP Sanjay Raut will go Belgaum anfer Minister Rajendra Patil Yadravkar arrested by Karnataka Police.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x