5 May 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

जातपात पुढे करून राज्यात जातीय तेढ वाढवलं जातंय : राज ठाकरे

सांगली : सध्याची राज्यांची आणि शहरांची स्थिती बघितल्यास आपली शहर बळकावली जात असून आणि उपरे आपआपल्या धर्माचे आणि जातींचे मतदारसंघ बळकट केले जात आहेत. पण दुर्दैवाने आपली महाराष्ट्रातील जनता निव्वळ बेसावध आहे अशी खंत ही त्यांनी बोलून दाखवली.

नुकत्याच घडलेल्या भीमा-कोरेगांव मधली घटनेचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, “सध्या महाराष्ट्रात जे घडत आहे त्यावर लिहिण्याचे धाडस लेखक करत नाहीत. जनतेमध्ये जातीपातीच्या नावाने उभी फूट पढण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे सर्वांनी या जातीय भिंती पाडून आणि महाराष्ट्रासमोर जे संकट येऊ घातलंय त्याला सामोरे जाण्यास तयार रहा” असा सूचक इशारा ही त्यांनी आपल्या भाषणात दिला.

मुंबईत घडलेल्या कमला मिल्स अग्नितांडवात अनेकजण मृत्युमुखी पडले आणि ते सर्व गुजराती समाजाचे होते म्हणून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर ट्विट करून शोक व्यक्त केला. इतकंच नव्हें तर पंतप्रधान केवळ गुजराती नाहीत हे त्यांनी ध्यानात ठेवावं असा खोचक टोला ही राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला.

महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत, त्यावर कुणीच काही बोलायला तयार नाही. राज्यात नोकऱ्या आहेत पण त्याही परप्रांतीयांच्या हातात जात आहेत. भाजप सरकारचा कारभार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की नुकतंच गडकरींनी मुंबई – बडोदा रस्त्यासाठी काही कोटी रुपये देण्याचे जाहीर केले पण ते देताना त्यांना महाराष्ट्र दिसला नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x